ताज्या घडामोडी

पी.एम.रिपोर्ट वरून मुलींच्या आई वडिलांचा आणि गावकऱ्यांचा आक्रोश

पोलीसांची कार्यवाही संशयास्पद असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.?

शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टराला बडतर्फ करा.
गावकऱ्यांनी केला चक्काजाम……..

प्रतिनिधी: चक्रधर मेश्राम 96234 59632

गडचिरोली तालुक्यातील अमीर्झा येथील किरण चंदणखेडे या एका शाळेकरी मुलीवर बलात्कार, अमानुष अत्याचार करून, त्यानंतर हत्त्या करून, तिचे प्रेत जवळच असलेल्या एका शेततळ्यात फेकण्यात आले. तिच्या एका लहान भावाने मारेकऱ्यांना घरी येवुन सोबत घेवून गेल्याचे सांगितले जात असताना सुध्दा गडचिरोली येथील पोलिसांनी मारेकऱ्यांना अजून पर्यंत अटक सुद्दा केली नसल्यामुळे, मारेकरी – बलात्कारी आजही खुले आम गावात फिरताना दिसत आहेत. किरण यांची हत्या व तिच्यावर बलात्कार झाला नसल्याची रिपोर्ट जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी दिल्यामुळे संतापलेल्या आई वडिलांनी व गावकऱ्यांनी मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी व मृतकाच्या नातेवाईकांना योग्य न्याय मिळण्यासाठी आज दिनांक 27 आक्टोबर ला इंदिरा गांधी चौकातून विशाल मोर्चा काढून इंदिरा गांधी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मृतक किरण ला न्याय मिळावा यासाठी आजूबाजूच्या अनेक गावकऱ्यांनी व आजूबाजूच्या हजारोच्या संख्येने मोर्च्यात आपली उपस्थिती दाखवून प्रशासना पुढे आपले रोष प्रगट केले. या विशाल मोर्चाचे नेतृत्व विजय शृगारपवार, मेघराज राऊत , प्रा. नामदेव खोब्रागडे, ग्रामपंचायतचे अनेक पदाधिकाऱ्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close