ताज्या घडामोडी

परभणी येथे मातंग – बौद्ध ऐक्य परिषदेचे आयोजन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व लहुजी क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने विभाग स्तरीय परिषद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंती निमित्त आज २८ जून रोजी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व लहुजी क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा विभागीय बौध्द -मातंग ऐक्य परिषदेचे आयोजन परभणी येथील कल्याण मंडपम,जायकवाडी वसाहत येथे करण्यात आले आहे. या बौध्द – मातंग ऐक्य परिषदेचे उदघाटक म्हणून मा. उत्तमराव सोनकांबळे (विभागीय सह संचालक लेखा व कोषागारे विभाग औरंगाबाद ) हे करणार आहेत.
तर या परिषदेची अध्यक्षता म्हणून वामन मेश्राम साहेब (राष्ट्रीय संरक्षक बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क व लहुजी क्रांती मोर्चा ) यांची उपस्थिती लाभणार आहे. सदरील या कार्यक्रमाचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. विलास खरात, प्रा. डॉ. डी. आर. कसाब, लखन चव्हाण विजय वाकोडे ,अजिंक्य चांदणे,सिद्धार्थ पानवाले , प्रा.मिलिंद आव्हाड,जोशीलाताई लोमटे,रेखाताई ढगे, एड.शिरीष कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तर. दुसऱ्या सत्रात मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रा.प्रताप चाटसे,प्रा.सूर्यकांत गायकवाड, प्रा.विकास पाथरीकर, बालाजी गोरे, वंदनाताई कांबळे, कॉ.गणपत भिसे,प्रा. व्येंकटेश कसबे,प्रा.डॉ.सुरेश चौथाईवाले, प्रा.डॉ.मारोती कसबे,अशोक उफाडे ,चांद्रमुनी गाडेकर, नितिनभाऊ कांबळे, एड.कुमार घनसावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. या बौध्द–मातंग ऐक्य परिषदेस मराठवाडा विभागातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नितीन कांबळे (प्रभारी मराठवाडा विभाग,लहुजी क्रांती मोर्चा) व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व लहुजी क्रांती मोर्चा सायोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close