ताज्या घडामोडी

उत्तुंगजेत यंग सायंटिस्ट परीक्षेच्या माध्यमातून ISRO इंटरव्ह्यूसाठी विद्यार्थिनीची निवड

प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के

भिसी येथील शिवाजी पब्लिक स्कृल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज भिसी च्या विद्यार्थिनीने “उत्तुंगजेत यंग सायंटिस्ट स्पर्धा परीक्षा 2026” मध्ये 100 पैकी 74 गुण प्राप्त करत उल्लेखनीय यश संपादन केले असून ISRO (Indian Space Research Organisation) च्या इंटरव्ह्यूसाठी निवड होण्याचा मान मिळविला आहे. विद्यार्थिनीच्या या यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर शिरभाये (ज्युनियर कॉलेज, भिसी) यांच्या हस्ते विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, विज्ञान क्षेत्रातील प्रेरणा व स्पर्धा परीक्षांसाठी सातत्याने प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभत असल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले.

विद्यार्थिनीच्या यशामागे सोनाली कडूकर मॅडम यांनी घेतलेल्या विशेष मार्गदर्शन वर्गांचे मोठे योगदान असून, ISRO निवड प्रक्रियेसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत परिश्रमपूर्वक तयारी करून घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनीला विज्ञान क्षेत्रातील स्पर्धात्मक तयारीस मोठी मदत झाली.

तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अविनाश बोरकर सर यांचे विद्यार्थ्यांना सातत्याने मिळणारे प्रोत्साहन व मार्गदर्शनही मोलाचे ठरले.

यावेळी शिक्षक नितेश उघडे, शिक्षकवृंद तसेच संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विज्ञान, संशोधन व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रोत्साहन देण्याचे कार्य शिवाजी पब्लिक स्कृल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज भिसी सातत्याने करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close