ताज्या घडामोडी

जवळा झूठा ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध

तहसीलदार श्री.हांदेशवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद;
.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील जवळा झूठा येथील ग्रामपंचायतीतील एका रिक्त सदस्य पदासाठी जाहीर झालेली पोटनिवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. तहसीलदार श्री. शंकर एन. हांदेशवार यांच्या पुढाकारामुळे गावात एकोप्याचे वातावरण कायम ठेवत निवडणूक प्रक्रिया टाळण्यात यश आले.
या सदस्य पदासाठी जयश्री शिवाजी झुटे आणि प्रियंका शरद झुटे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र, एकच जागा असल्याने निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. गावात सलोखा राखण्यासाठी तहसीलदार श्री. हांदेशवार यांनी संबंधित उमेदवारांसह ग्रामस्थांशी संवाद साधत बिनविरोध निवडीसाठी आवाहन केले.


तहसीलदारांच्या विनंतीला मान देत जयश्री शिवाजी झुटे यांनी माघारीच्या अंतिम दिवशी (दि. १७ एप्रिल) दुपारी ३ वाजण्यापूर्वी आपला अर्ज मागे घेतला. परिणामी, प्रियंका शरद झुटे यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड निश्चित झाली.
या प्रक्रियेत ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत श्री. गणेश रेवणवार, तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय श्री. बी. ए. बोरकर (कनिष्ठ सहाय्यक), श्री. महेंद्र सोनवणे (कनिष्ठ सहाय्यक) आणि श्री. सय्यद (ग्राम महसूल अधिकारी) यांचेही सहकार्य लाभले.
बिनविरोध निवड झाल्यानंतर तहसीलदार श्री. शंकर एन. हांदेशवार यांनी प्रियंका शरद झुटे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. गावात शांतता व एकोप्याचे वातावरण राखत घेतलेला हा निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close