प्रहार कडून पाथरी येथील वृद्धाश्रमास रग (ब्लॅंकेट )वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्ष माजलगाव च्या वतीने पाथरी येथील ओंकार वृध्दाश्रम याठिकाणी वृद्ध मातापित्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांचे स्वीय सह्हायक मा. संतोष राजगुरू, डॉक्टर जगदीश शिंदे, जालना जि.प. सदस्य बप्पासाहेब सवणे, व इतर मान्यवरांच्या हस्ते वृद्ध मातापित्यांना रग (ब्लॅंकेट)चे वाटप करण्यात आले

यावेळी वृद्धांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान होते ते काम बच्चुभाऊ कडु यांची समाजसेवा करण्याची प्रेरणा व विचार घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष माजलगाव च्या वतीने ता.अध्यक्ष गोपाळ पैंजणे, संपर्क प्रमुख भारत डोंगरे,ता.उपाध्यक्ष नितीन कांबळे,सो.स.मि.ता.प्र अशोक अर्जुन, युवक ता.अध्यक्ष भागवत डोईजड,युवक उपाध्यक्ष अविनाश ढगे, शहर अध्यक्ष मुस्ताक कुरेशी, विकास जगताप, दिनकर बादाडे, महादेव डाके, गणेश कुकडे,किसन चितारे यांनी केले