ताज्या घडामोडी

नवनियुक्त ग्राम पंचायत सदस्यांच्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते सत्कार

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

सिरोंचा तालुक्यातील व्येंकटापूर ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या नवनियुक्त सदस्यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
तालुक्यातील व्येंकटापूर येथील तीन ग्राम पंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकी घेण्यात आली यात आविस पॅनलकडून पोसक्का गड्डी व पेंटीं तलांडी ह्या दोघेही निवडून आले असता त्यांच्या सत्कार वेनलाया येथे आयोजित एका कार्यक्रमात जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार प्रसंगी आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,सरपंच अजय आत्राम,आविस सल्लागार रवी सल्लम,माजी उपसरपंच वेंकटस्वामी कारसपल्ली,जाफराबादचे उपसरपंच तिरूपती दुर्गम सह गावकरी,आविस पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close