ताज्या घडामोडी

हिराई महोत्सवात दुसऱ्या दिवशी चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व माविम चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने बचत गट प्रदर्शनीच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. विविध महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, कपडे, दागिने आणि सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी होती.


दिवसभरात मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देत खरेदी केली. विशेषतः महिलांनी स्वनिर्मित उत्पादनांचे स्टॉल लावून आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. काही स्टॉलवर पारंपरिक पदार्थांची चव चाखण्यासाठीही गर्दी दिसून आली.
प्रदर्शनीत सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होते.
दुसऱ्या दिवशी श्री. व्यंकटेश्वरा नाट्य संपदा मंडळ नवरगाव निर्मित पैसा रे पैसा या झाडीपट्टी नाटकाचा रंगतदार माहोल पाहायला मिळाला. कलाकारांनी सादर केलेल्या कलेला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
प्रदर्शनी पुढील तीन दिवस सुरू राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन कडून करण्यात आले करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close