खा. सुनील मेंढे यांनी केले सुदाम शहारे यांचे अभिनंदन
घेतली सदिच्छा भेट
प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
वयाच्या सत्तराव्या वर्षी देशाचे प्रतिनिधित्व करीत जेष्ठाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून स्पेनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुदाम शहारे यांची सदिच्छा भेट घेत खासदार सुनील मेंढे यांनी अभिनंदन केले.
आज पोहरा येथे सुदाम शहारे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार सुनील मेंढे यांनी त्यांची भेट घेतली. या वयात देशाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्ण जिंकणे म्हणजे तरुणांनाही लाजविनारे आहे. स्पेन येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून हा गौरव प्राप्त करून देणाऱ्या सुदामजी यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचे खा. सुनील मेंढे म्हणाले. भावी स्पर्धेसाठी यावेळी खासदारांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांशी खासदारांनी चर्चा केली तसेच समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करण्यासाच्या दृष्टीने आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, महामंत्री पद्माकर बावनकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कोमल गभने, भाजपा तालुका अध्यक्ष धनंजय घाटबांधे, भाजपा महामंत्री बाळाभाऊ शिवणकर, भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम, पोहरा ग्रा. पं. सरपंच रामलाल पाटणकर, जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख घनश्याम मते, ग्रा. पं. सरपंच मांगली प्रशांत मासूरकर, शक्ती केंद्र प्रमुख भूषण नागलवाडे, ओबीसी आघाडी संपर्क प्रमुख मुकेश मते, भाजयुमो जिल्हा संपर्क प्रमुख देवेश नवखरे, भाजयुमो तालुका अध्यक्ष उमेश गायधनी, भाजयुमो जिल्हा सचीव गिरीश बावनकुळे, भाजयुमो सह संपर्क प्रमुख पंकज चेटुले, माजी पं. स. सभापती सूर्यभान सिंगनजुडे, बुथ प्रमुख धनराज मेश्राम, राजेश दोनोडे, देवेंद्र बोरकर, नितीन वालोदे, रवींद्र मेश्राम, केशव गायधने,राजेंद्र कुंभारे, निरंजन सार्वे, तेजस कमाने, अक्षय कांबळे व आदी उपस्थित होते.