राजमाता जिजाऊ जगातिल संपुर्ण मातेसाठी आदर्श चरित्र – समतादूत प्रज्ञा राजूरवाडे


मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
विखुरलेल्या देशबांधवाना ऐकतेच्यासुत्रात गुफुन स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रंचड आत्मविश्वास राजमाता जिजाऊनी शिवरायामंधे निर्माण केला जिजाऊचा लढा हा अखंड मानवजातीसाठी शोषकांच्या विरोधात होता राजमाता जीजाऊ यांच्या विचारांची साधी आठवन जगातिल प्रतेक मातेला म्हत्वाकांक्षी केल्याशिवाय राहत नाही आज काळ बदलला असेल पन जेव्हा जेव्हा जगाला देशाला सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थितीविषयी सक्षम मार्गदर्शनाची गरज लागनार तेव्हा भारतातिल वीर शिवरायाचा इतीहासच शौर्य धर्य नेतृत्वाची दिशा दाखवन्याचे कार्य करेल म्हणून ऐक आदर्श चारित्रवाण शिवरायासारखा पुत्र जर घडवायचा असेल तर जगातिल संपुर्ण मातेसाठी राजमाता जिजाऊचे आदर्श चरित्र प्रेरक आहे असे प्रतीपादन ड्रा बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण व संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी रास्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवनिम्मीत श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार येथे राजमाता जिजाऊ, सवित्रीबाई फुले जयंती तथा श्री संत तूकडोजी महाराज पुण्यतिथी यांच्या संयुक्त कार्यक्रमात महिलाउन्नती या विषयावर हळदीकुकू कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होत्या

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुमित्रा धारने होत्या तर प्रमूख अतिथी कांताबाई थेरे , प्रा.अशोक चरडे,अरविद देवतळे उज्वला देवतळे सुमनताई पाटिल आदी उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की माता केवळ मायाळू नसून शक्ती अशु शकते हे आदर्श चरित्र म्हणजे राजमाता जिजाऊ रास्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेच्या 20 अध्यायात महिलाउन्नतीवर म्हणतात मातेच्या स्वभावे पूत्राची घडन त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन जिच्या हाती पाळन्याची दोरी ती जगाला उधारी तुकडोजी महाराज यांचा महिला विषयीचा विचार लक्षणीय आहे ग्रामगिता वाचली तर महिलाच्या प्रगतिच्यावाटा मीळतिल राजमाता जिजाऊ सवित्री बाई फुले ह्या दैववादी नसून प्रयत्नवादी वैज्ञानिक होत्या राजमाता जिजाऊनी शिवरायांना वैचारिक संस्कार दिले स्त्रीयांचा सन्मान करण्यास शिकवले
जातीधर्माच्या चौकटी मोडल्या सोशल इंजीनीयरिंग केले अमावश्याच्या दिवशी शिवबाला शत्रुवर विजय मीळवन्यासाठी लढाई करण्यास पाठविले जिजाउचा हाच वीचार स्त्रीयांनी आत्मसात केला तर घराघरात सक्षम जिजाऊमाते सारखे चरित्र तयार होतिल आपल्या मुलात आपंन शिवराय शोधू सवित्रीबाई फुलेनी हळदीकुकू कार्यक्रमाची सुरवात यासाठी केली होती की स्त्रीयानी विचाराचे वाने वाटली पहिजे सर्वजातीधर्माच्या महिला ऐकत्र येवुन आपले सुख दुख समाजातिल समस्या त्या मांडतिल हा ऊद्देश त्यांचा होता महिला विचाराचे वाने न वाटता महिलाच महिलाचे विरोधक होतात हळदीकुकू कार्यक्रमात विधवा महिलांचा सन्मान होने आवश्यक आहे तेव्हाच सवित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ,रास्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातिल सक्षम महिला आपंन होवू असे सविस्तर मार्गदर्शन प्रज्ञा राजूरवाडे यांनी यावेळी केले गावातिल सर्व विधवा महिलाचा सन्मान यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कमल गुडधे यांनी केले