ताज्या घडामोडी

शिवाजी पब्लिक स्कूल, भिसी येथे अबिलिटी टेस्टचा भव्य कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के

भिसी (ता. चिमूर) : येथील शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भिसी मध्ये नुकताच अबिलिटी टेस्टचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भिसी परिसरातील विविध शाळांमधील इयत्ता चौथी ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.


या अबिलिटी टेस्टमध्ये एकूण 947 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ज्यामुळे हा उपक्रम परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून
मा. हर्षलभाऊ डुकरे (बांधकाम सभापती, नगरपंचायत भिसी, ता. चिमूर, मा. हेमंत अजमलवार (ईगल अकॅडमी, उमरेड)
प्रो. तागडे सर (प्राध्यापक, रिफ्लेक्शन अकॅडमी, अकोला)
नगराडे सर (प्रतिनिधी, कोटा अकॅडमी, राजस्थान)
तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय ज्ञानेश्वर शिरभये सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या भविष्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया व संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची ओळख होऊन त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close