सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांची कबड्डी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

तालुका प्रतिनिधी:हेमंत बोरकर
चिमूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत स्थापित क्रांती महिला ग्रामसंघ बोथली (वाहनगाव) यांच्या वतीने भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांची कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. विनोद देठे सरपंच बोथली होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. शितल थुटे प्रभागसंघ व्यवस्थापक यांनी समाजातील स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात समता महिला प्रभाग संघ अध्यक्ष वंदना गुडधे, सचिव संगीता मेश्राम, पशु व्यवस्थापक श्री. पुंडलिक गेडाम क्रांती ग्रामसंघ अध्यक्ष रत्नमाला देवतळे सचिव सुषमा घरत, बहादुरेताई यांची भाषणे, कविता व गीतांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा संदेश दिला. शेवटी सर्व उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास सर्व समूहाच्या महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








