शैक्षणिक वर्ष 2024 -25 या वर्षातील वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी
ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, शैक्षणिक वर्ष 2024 -25 या वर्षातील,
दिनांक 30- 12 -2024, वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले, उद्घाटनाप्रसंगी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून, उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला, प्रसंगी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय रामचंद्र कदम साहेब, उपाध्यक्ष मधुकर जी पाटील, रणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय निडबणे सर,संस्थेचे युवा संचालक प्रतापसिंह कदम सर, विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन सर, पर्यवेक्षक आनंद सर ज्युनिअर व प्रमुख सावंत सर, क्रीडाशिक्षक काळे सर, व उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका,व कळंब गावचे काही ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले, यावर्षीचा क्रीडा सप्ताह एकूण चार दिवस आयोजित केला जाणार असून, यामध्ये प्रामुख्याने विद्यालयाचे व कळम गावचे नाव लौकिक मिळवणारा प्रमुख खेळ म्हणजे कबड्डी, खोखो, रनिंग, क्रिकेट, गोळा फेक लांब उडी, असे अनेक खेळ या वार्षिक क्रीडा सप्ताहामध्ये घेतले जाणार आहेत, आपल्या वालचंद विद्यालयाबाबतची माहिती जूनियर विभागाचे प्राध्यापक सागर पवार सर यांकडून माहिती देण्यात आली..
एकूणच कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
प