ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

पारडपार-खापरी रोडची त्वरित उपाययोजना करा शुभम मंडपे यांची मागणी

मुख्य संपादक : कु.समिधा भैसारे

दिनांक 18ऑगस्ट 2021
पारडपार-खापरी रोडवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत व या गड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व या गंभीय संस्येकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे खूप मोठे दुर्लक्ष होत आहे त्यामुडे आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी पारडपार-खापरी मार्गाची त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे व जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

ह्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व हे रास्तावरील गड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत या रस्ताने पारडपार येथिल शेतकरी व शेतमजुर जाणे-येणे करीत असतात व हा मार्ग पारडपार वरून जांभुळघाट व खापरी वरून चिमुर ला जाणारा मुख्य मार्ग आहे व या मार्गाने शेतकरी व शेतमजूर व अन्य प्रवास करीत असतात मात्र या रसत्याकडे स्थानिक प्रशासनाचे व सर्वांजिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे तरी पारडपार-खापरी रस्त्याची त्वरित उपपयोजना करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर येथे देण्यात आले यावेळी आंबोली ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे ,व सरपंच संघाचे चिमुर तालुका अध्यक्ष व उपसरपंच वैभव ठाकरे , व सम्यक चे पदाधिकारी निलेश गावंडे , निखिल रामटेके , संदीप बन्सोड ,सुरज धुर्वे व पारडपार येथील शेतकरी ऋषिकेश मोटघरे , शैलेश मेश्राम विवेक मेश्राम , प्रतीक वाघमारे , स्वप्नील गजभे , चंद्रशेखर गजभे निकेश केराम , नागसेन गणवीर ,उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close