ताज्या घडामोडी

जिल्हाभरातील शेतक-यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडा -सखाराम बोबडे पडेगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी कालवा व तलावाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी निवेदनाद्वारे सोमवारी केली.

गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आले. रब्बी हंगाम सुरू झाला असून पिके पावसाअभावी सुकत आहेत. पाऊस पडत नसल्याने या हंगामातील पिके वाचवण्यासाठी जिल्ह्यातीन शेतकऱ्यांना पाणी देणारे डावा व उजवा कालवा त्याचबरोबरच इतर कालव्या सह जिल्ह्यातील मध्यम, लघु तलावातून पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. पाणी सोडण्यापूर्वी कालवा व चारयांची दुरुस्तीचे कामे सरकारी खर्चाने करावीत

.त्याचबरोबर कालव्याच्या बाजूचे रस्तेही दुरुस्त करावीत अशी मागणी एका निवेदनाद्वारे सोमवारी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केली. शेतकऱ्यांनी चाऱ्या दुरुस्तीसाठी स्वतःचे पैसे खर्च करू नयेत. काही अधिकारी शेतकऱ्यांना चाऱ्या दुरुस्ती करण्याचे फर्मान सोडत असल्यास आपण मा जिल्हाधिकारी किंवा आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close