ताज्या घडामोडी

शांताबाई नखाते उच्च माध्यमिक विद्यालय पाथरीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल 100℅ तर कला शाखेचा निकाल ८४. ७३%
पाथरी वार्ताहर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी या विद्यालयाने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली आहे.
प्रस्तुत शांताबाई नखाते उच्च माध्यमिक विद्यालयातून 229 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 209 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल 100 % लागला असून या शाखेतून अनुक्रमे 51 व 47 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. कला शाखेतून 131 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 111 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 41 विद्यार्थी प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे अध्यक्ष मा. अनिलभाऊ नखाते, सचिव सौ. भावनाताई नखाते, संचालक मा. आदित्य भैय्या नखाते, मा. अजिंक्य भैय्या नखाते गटशिक्षणाधिकारी मा. शिवाजीराव गिते, शिक्षण विस्तार अधिकारी मुकेशजी राठोड, प्रशासकीय अधिकारी सरोदे आर एस, प्राचार्य के एन डहाळे, मुख्याध्यापक एन ई यादव, उप मुख्याध्यापक आर जे गुंडेकर, उप मुख्याध्यापक एन एस जाधव, विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close