नेरी ग्राम पंचायत ला निरर्जंतुकीकरणाचा पडला विसर
उपसंपादक : विशाल इन्दोरकर
दिवसेंदिवस नेरीतील कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून नेरी मध्ये निरर्जंतुकीकरण करणे गरजेचे असतांना मात्र याचा नेरी च्या ग्राम पंचायत ला विसर पडल्याचे चित्र आहे. मागील वर्षाच्या कोरोना लाटेत गावाला काही प्रमाणात निरर्जंतुकीकरण करण्यात आले होते. मात्र या वेळेस फक्त वार्ड न. चार मधील ( धनगर मोहला ) मध्ये काही भागात फवारणी करण्यात आली व बाकीच्या वार्डात फवारणी न केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्राम पंचायत प्रती रोष व्यक्त केल्या जात आहे. कोरोना ससंर्गाची साखळी तोडण्यासाठी नेरी मध्ये जनता कर्फ्यू, लॉकडाऊन सारख्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. तरी देखील रुग्णाची संख्या वाढतीवरच आहे. परिणामी गावातील जनजीवन ढवळून निघाले असून भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थीतीत विशेष खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपायांची अमलबजावणी करणे नितांत गरजेचे असतांना याबाबत ग्राम पंचायत नेरी मात्र उदासीन दिसून येत आहे. त्यातच अशा गंभीर परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या जबाबदारी चा ग्राम पंचायत ला विसर पडला असल्याची जनसामान्यांत चर्चा आहे. नेरी गावाची कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन वार्डा वार्डात फवारणी करणे गरजेचे आहे .अशी मागणी नेरी तील नागरीकांकडून होत आहे.