वाचनामुळे मेंदूला सकारात्मक उर्जा मिळते
ग्रामीण प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड
प्रत्येक व्यक्ती आपले वाचन समृध्द करुन विकास साधु शकतो व वाचनामुळे मेंदूला सकारात्मक उर्जा मिळते. हे विचार पटवून, सोशल मिडीयावर वाचन संस्कृतीचा प्रसार होईल तसेच वाचन करण्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावे. असे डॉ जी. डी. देशमुख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने मा. पी. एन. पणिकर यांची पुण्यतिथी प्रीत्यर्थ आयोजित “राष्ट्रीय वाचन दिन’’ कार्याक्रमात विचार व्यक्त केले प्रस्तुत कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . अनिल एन. कोरपेनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकिय नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आला.
डॉ. विकास मोहतुरे यांनी “ मा . पी . एन . पणिकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकुन, प्रत्येकांनी किमान अर्धा तास एकात्रित बसवुन वाचनासाठी वेळ दयावा, असे सुचविले
कार्यक्रमाची सुरुवात मा. पी. एन. पणिकर यांच्या प्रतीमेस माल्यार्पन व दिपप्रज्वलनाने करण्यात आले . कार्यक्रमास ग्रंथपाल प्रा . चकधर भुर्रे, प्रा. मनिष मत्ते व रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा . प्रचल ढोक यांची उपस्थिती होती.
सुत्रसंचालन ग्रंथपाल प्रा . चक्रधर भुर्रे यांनी केले आभार रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा . प्रचल ढोक यांनी मानले .
राष्ट्रीय वाचन दिनाच्या अनुषंगाणे मा. पी. एन. पणिकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली व ऑनलाइन सभेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगण्यात आले
कार्यक्रमाला महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .