अखेर सहा महिन्यानंतर मिळाला सिरपुर ग्राम पंचायतला स्थायी सरपंच

प्रतिनिधी:सुनिल गेडाम
सविस्तर वृत्त असे कि, चिमूर तालुक्यातील मौजा शिरपूर ग्राम पंचायत्ती मधील सरपंच पद मागील सहा महिन्यापूर्वी पासून रिक्त होते.त्यामुळे चिमूर येथील निवडणूक अधिकारी मा. तहसीलदार साहेब यांनी दि. 14/02/2025 रोजी सरपंच पदाची निवडणूक घेतली असता एकमताने श्री. जयपालजी वसंता गावतुरे यांची सर्व सदस्यानुमते सरपंच पदी निवड करण्यात आली.त्याच्या सरपंच पदी निवडीमुळे ग्रा पं शिरपूर येथील ग्रामपंचायत अधिकारी मा. एल. एन. भसारकर साहेब, उपसरपंच राजेंद्र भानारकर, तसेच सर्व सदस्य तथा ग्रामपंचायत कर्मचारी मा. मंगेशजी भानारकर, संगणक परिचालक व मोहन बोरकर, शुभम पाटील आणि त्यांचे मित्र मंडळी कडून अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात. तसेच गावाचा सर्वांगीण विकास व गावातील जनतेची सेवा सदैव करण्यास मी कार्यशील राहून सेवेचा वारसा अविरत सुरु ठेवणार असे मानस नवनियुक्त सरपंच मा. जयपालजी गावतुरे यांनी व्यक्त केले.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मा.कुंभरे साहेब मंडळ अधिकारी यांनी कर्तव्य पार पाडले.