लांझेडा येथे भव्य रक्तदान,व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर शक्तीकेंद्र यांच्या वतीने देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाडा या कार्यक्रमा निमित्त भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर तथा नमो प्रदर्शनी,आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड नोंदणी वाटपाचा कार्यक्रम लांझेडा, इंदिरानगर येथे बाल गणेश मंडळा जवळ आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमा निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांनी दीपप्रज्वलन करुन गणपती बाप्पा चे दर्शन घेत शहरातील लांझेडा,इंदिरानगर येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरांचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करून स्वतः शुगर बीपी तपासून शुभारंभ करून यांचा शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी याप्रसंगी केले. या निमित्त जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी सुद्धा बीपी शुगर तपासणी केली.
यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,शहर महामंत्री विनोद देओजवार,शहर महामंत्री हर्षल गेडाम,भाजपाचे श्याम वाढई, नरेश हजारे,कान्होजी लोहंबरे, तसेच मोठया संख्येनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते,व इंदिरानगरातील बाल गणेश मंडळाचे सदस्यगण उपस्थितीत होते.