युवकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
ग्रामीण प्रतिनिधी :अंकुश खोब्रागडे गोवर्धन
पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा दीक्षित येथील सुरज कालिदास पेंदोर (वय 18 वर्ष) युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक युवक नेहमीप्रमाणे पाणी आणायला घराशेजारच्या विहिरीवर गेला. असताना अचानक त्याला भोवळ आल्याने तोल जाऊन विहिरीत पडला. परंतु जवळ कोणीही नसल्याने त्याच्या मदतीस कुणीही जाऊ शकले नाही काही वेळाने गावातील महिला पाणी आणायला गेले असताना मृत्यू देह पाण्यावर तरंगताना दिसला. या घटनेची माहिती दूरध्वनीवरून पोलीस स्टेशनला तात्काळ देण्यात आली. पोंभुर्णा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यू देह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी आहेत. पेंदोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.