मराठा आरक्षण आंदोलकांना जामीन मंजूर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 18/07/2016 रोजी कोपर्डी येथील भगीनीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने विद्यापीठ परिसर काळीकमान येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते येथूनच मराठा क्रांती मोर्चा परभणी ची ठिणगी राज्यभर पसरली.काल या आंदोलनाची पोलीस प्रशासनाने संभाजी ब्रिगेडचे नितीन भैया देशमुख व संदीप माटेगावकर, व रामदास अवचार यांना समन्स पाठवून कोर्टात हजर होण्यास सांगितले होते.आज न्यायालयात हजर झाल्यानंतर परभणीचे प्रसिद्ध विधीज्ञ सामजिक भान असलेले ॲड अमोल देशमुख, ॲड अजय करंडे, ॲड वैभव देशमुख, ॲड भूषण दवांडे ॲड सुजित भैया देशमुख यांनी तातडीने आज कोर्टात आमच्या सर्वांची जामीन मंजूर करून घेतली. या आंदोलनातील सर्व मराठा बांधवांनचे मोफत केस लढवण्याची जबाबदारी ॲड अमोल देशमुख, ॲड अजय करंडे, ॲड वैभव देशमुख, ॲड भूषण दवांडे,ॲड ज्ञानेश्वर घुले पाटील यांनी घेतली आहे.
सकळ मराठा बांधवांन तर्फे व मराठा क्रांती मोर्चा परभणी तर्फे वकील साहेबांचे खूप खूप आभार व धन्यवाद.या वेळी आमची जामीन घेणारे शेतकरी तुकारामजी जामकर यांचे सुधा मनःपूर्वक आभार.या आंदोलनात मराठा आंदोलक संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, शिवराज जगताप, विठ्ठल तळेकर, गजानन जोगदंड, रामेश्वर शिंदे, राहुल खटिंग, रामदास आवचार बालाजी मोहिते संदीप माटेगावकर , लक्ष्मण मोहिते, प्रवीण भैया देशमुख या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.