ताज्या घडामोडी

शाळेबाहेरची शाळा : आकाशवाणी कार्यक्रमात मदनापूर या गावातील चिराग नारनवरे यांनी दिली मुलाखत


मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शाळांची दारे बंद आहेत. मोबाईलचा वॉट्सप ग्रुपचा वापर करून चिमूर तालुक्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी त्यांच्या करीता अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. नागपूर आकाशवाणी, प्रथम संस्था तसेच शिक्षण विभागीय कार्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरीता शाळा बाहेरची शाळा, उपक्रम राबविला जात आहे.असाच उपक्रम चिमूर तालुक्यातील मदनापूर या गावी राबविण्यात आला त्यात मदनापूर येथील चिराग नारनवरे यांनी मुलखात देहून त्यांना चांगलेच यश मिळू लागले आहे.मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी १० वाजता नागपूर आकाशवाणीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे धडे दिले जातात. ज्यांच्याकडे अ‍ॅण्ड्राईड मोबाईल नाही, त्यांना समाजमंदिरावरील भोंग्याचा वापर करून विद्यार्थ्यांना शाळा बाहेरच्या शाळेत शिक्षणाचे धडे दिले जातात.शाळा बाहेरची शाळा हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी गावच्या सरपंचांना फोन करून त्यांना या उपक्रमाची माहिती दिल्या जाते. पालकांसोबत संवाद साधून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थीचे शिक्षण सुरूच राहावे पण याकरीता शासकीय यंत्रणेवर वेगळा भारही यायला नको, याची काळजी घेत शाळा बाहेरची शाळा सुरू झाली. आता ती गावा गावांत पसरली आहे. प्रथम संस्थाचे स्वयंसेवक याकरीता गावा गावात पोहोचून शाळा बाहेरची शाळा उपक्रम राबवीत आहे.शाऴा बाहेरची शाळा या कार्यक्रमात मुले आनंदाने सहभागी होत आहेत. घरगुती वातावरणात ही शाळा चालते. पालकही मुलांना वेळीच मार्गदर्शन करू शकतात. मुले नेहमी कार्यक्रमाबाबतच्या एसएमएसची वाट पाहतात. कोणीतरी आपल्यासोबत बोलतच आहे, अशी ही शाळा बाहेरची शाळा विद्याथ्र्यांना आनंदी वातावरणात शिक्षण देत आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण अविरत ठेवले जात आहे. या शिक्षणात मुलांना अभ्यास करणेही सोपे जाते.

प्रथम संस्थेच्या स्वयंसेवकांनी मोबाईलच्या व्हॉटस्अ‍ॅपवर पालकांचे ग्रुप तयार केले. त्यावर मुलांकरीता अभ्यास येत होता. शाळा बाहेरची शाळा उपक्रमात रेडिओ किंवा मोबाईल अ‍ॅपवर कार्यक्रम ऐकता येतो. सुरुवातीला मुलांना अभ्यासाकरीता बोलवावे लागायचे. आता मुलेच स्वत: अभ्यास करतात.यामुळे पालकांनाही प्रेरणा मिळते.

श्री,ज्ञानेश्वर श्रीरामे
स्वयंसेवक, प्रथम संस्था
करबडा ता,चिमूर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close