ग्रामपंचायत गंगासागरहेटी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

तालुका प्रतिनिधी:प्रा. विश्वनाथ मस्के.
(दि. 03/01/2026)
गंगासागरहेटी — ग्रामपंचायत गंगासागरहेटी येथे थोर समाजसुधारिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दि. 03 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. होमराजजी खांडेकर (माजी ग्रामपंचायत सदस्य) हे उपस्थित होते. तसेच श्री. हीवराजजी मडावी, ग्रामपंचायत कर्मचारी नी केश वरठी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करावा, असे मत व्यक्त केले. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रम शांततामय व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








