स्व.नितीन महाविद्यालय रा.से.यो.विभागाचे विशेष शिबीराचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील खेडुळा येथे स्व.नितीन महाविद्यालयातील रा.से.यो.विभागाच्या विशेष शिबिराचे आयोजन दि. 25 जानेवारी पासुन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन खेडुळा येथील सरपंच सौ शोभा बालासाहेब डुकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राम फून्ने तर कुणाल लहाने यांची उपस्थिती लाभणार आहे .यावेळी सात दिवशीय शिबिरात विविध विषयांवर प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच आरोग्य मार्गदर्शन व विविध आरोग्य तपासण्याही होणार आहेत.तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रम काव्यमैफल रंगणार आहे. माझा युवा भारतासाठी व डिजिटल साक्षरतेसाठी या शिबिराचा समारोप दिनांक 30 जानेवारी गुरुवार रोजी माजी आ. हरिभाऊ काका लहाने यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या विशेष शिबिराच्या उदघाटन कायर्कमात
गटशिक्षणाधिकारी श्री मनोज चव्हाण साहेब , ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री बजरंग गिल्डा साहेब ,मुख्याध्यापक श्री माणिक घाटूळ सर व
शाळेतील इतर शिक्षक
श्री राजाभाऊ येडके सर
श्री श्री राजकुमार लांडे सर
श्री बाबासाहेब पानझाडे सर
श्री नामदेव खिळदकर सर उपस्थित होते. या विषेश शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉक्टर राम फुन्ने व कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक टि.एफ काळे, प्रा .जी.जे.मोरे डॉ. शितल गायकवाड , रामदास बलवंते व समस्त गावकर्यांच्या वतीने केले आहे.