डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘नाचून नाही तर वाचून साजरी करा’:- प्रहार सेवक विनोद उमरे
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर
चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरी (बिड) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती साजरी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरी बिडकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली .
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास हिंवज सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक शाळा सावरी यांच्या वतिणे राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. सर्वांनी मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करावी. मागचे २ वर्ष जयंती साजरी करता आली नाही मात्र ह्या वर्षी विविध सामाजिक, आणि लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहावी.
भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र राज्यशास्त्र, समाजशास पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. आणि आजही त्यांचे लिखाण हे सर्वांनाच मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप निखाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावरी ग्रामपंचायत सदस्य रवि शेंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” हा संदेश सर्वा विद्यार्थी आत्मसात करावा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास हिंवज सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक शाळा सावरी.कार्यक्राचे उद्घाटक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप निखाडे.प्रमुख अतिथी प्रहार सेवक विनोद उमरे प्रमुख पाहुणे रवि शेंडे ग्रा.प. सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आत्राम सर यांनी केले तर प्रास्ताविक सावाकडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन कूरेकार मॅडम यांनी केले कार्यक्रमाले जिल्हा परिषद शाळा येथिल विद्यार्थी व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.