आनंद निकेतन महाविद्यालय येथे स्वेच्छा रक्तदान विषयावर शॉर्ट विडिओ स्पर्धा
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा/जिल्हा एड्स नियंत्रण पथक चंद्रपूर, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा व रेड रिबन क्लब आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा च्या माध्यमातून स्वेच्छा रक्तदान या विषयी युवकांमध्यें जनजागृती करीत रक्तदानांचे महत्व पटवून देण्यासाठी शॉर्ट विडिओ व फिल्म स्पर्धा ( 1 मिनिट) घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई (महाराष्ट्र राज्य) मार्फत युवक युवतीं मध्ये रक्त दांनाचे महत्व तसेच रक्ता ची दैनंदिन जीवनात निकळ लक्षात घेता या विषयी जनजागृती व्हावी, व त्यांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटका पर्यंत रक्तदानांच्या मह्त्वा विषयी माहिती पोहचविण्याचा उपक्रम राबविन्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा च्या रेड रिबन क्लब तर्फे ‘स्वेच्छा रक्तदान या विषयावर शॉर्ट विडिओ व फिल्म स्पर्धेचे’ आयोजन प्रा. डॉ मृणाल काळे, डॉ. अंकुश राठोळ वैद्यकीय अधीक्षक उजिरू वरोरा यांच्या मार्गदर्शनात ऑनलाईन करण्यात आले होते. स्पर्धे मध्ये तालुक्यातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक कु. वैष्णवी गावंडे हिरालाल लोया क. महाविद्यालय, वरोरा, द्वितीय पुरस्कार सोहम उमाकांत जावादे, सेंट आनिस हायस्कूल, बोर्डा, तर तृतीय पुरस्कार प्रज्वल गावंडे, लोकमान्य महाविद्यालय वरोरा यांनी मिळवीला . तसेच प्रोत्साहन पर बक्षीस आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा च्या विध्यार्थी अनुक्रमे जानवी किनाक्के, कोमल मिलमिले, प्राजक्ता किनाक्के, व प्रणव कवाडे यांनी प्राप्त केले. स्पर्धचे परीक्षक म्हणून प्रा .तिलक ढोबळे प्राध्यापक मोक्षदा नाईक यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीते करिता रेड रिबन क्लब च्या समन्वयक डॉ. रंजना लाड, ,गोविंद कुंभारे सौ. चंदा उमक, प्रयांनी प्रयत्न केले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस रूपाने रोख रक्कम व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.