ताज्या घडामोडी

फळझाडांच्या माध्यमातून आर्थिक विकास करूया- अमोल ठाकूर

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

उप पो.स्टे व्यंकटापूर येथे पोलीस अधिक्षक गडचिरोली अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली (अभियान) मनिष कलवानीया, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी सोमय मुंडे यांचे प्रेरणेने उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कृषी मेळाव्यास मौजा आवलमारी गावाच्या सरपंच सौ सुनंदाताई कोडपे, उपसरपंच चिरंजीव चालविलवार, माजी सरपंच मारोती मडावी, पोलीस पाटील बाबुराव झाडे, मनोहर पागडे, शामराव कुलमेथे, जगय्यजी परकीवार, नामदेव कांबळे व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी, अमोल ठाकूर यांच्या उपस्थितीत 2,500 फळझाडांचे (आंबा, सीताफळ,पपई,चिंच) हद्दीतील नागरिकांना वाटप करण्यात आले प्रसंगी अमोल ठाकूर यांनी गडचिरोली पोलीस विभाग नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगून कोणतीही समस्या असल्यास अहेरी हेल्पलाईन नंबर 7887313676 या नंबर वर संपर्क साधण्याचा सूचना नागरिकांना दिल्या.
सरपंच सुनंदाताई कोडपे यांनी समाजाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे सर्वांना आवाहन केले तसेच सर्व गावकऱ्यांनी वारंवार पुढाकार घेऊन गावासाठी रस्ता तयार करून घेतल्याची माहिती दिली. पोलीस पाटील बाबुराव झाडे यांनी तेलगू व गोंडी भाषेतून सर्व नागरिकांनी फळझाडे लावून त्यातून मिळणारे उत्पन्न बाजारात विकून आपली आर्थिक उन्नती करा असे सर्वांना आवाहन केले.
दरम्यान 47 आयुष्यमान भारत कार्ड, 11 आधार कार्ड वाटप करण्यात आले. नागरिकांना श्रवण बाळ योजना, पी एम किसान योजना , जॉब कार्ड काढणे याबाबत माहिती दिली.
हद्दीतील प्रगतशील शेतकऱ्यांचा मेळाव्यात सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडून इतर शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मौजा व्यंकटापूर येथील मदानय्या आत्राम यांनी अनेक वर्षे एकट्याने अंग मेहनत करून शेततळे बांधले आहे.अमोल ठाकूर पोलीस अधिकारी यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन ठाकूर साहेबांनी दिले.
गरजूंना कपड्यांचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना हॉली बॉल चे वाटप करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close