अवैध उत्तखनन करणाऱ्या ट्रैक्टर वर वनविभागाची कार्यवाही
तीन ट्रॅक्टर जमा
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
वनविभाग परिसरात अवैध उत्खनन करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच वन विभाग पथकाने गस्ती दरम्यान 3 ट्रैक्टर वर कार्यवाही केली असून ट्रैक्टर सरकार जमा केले आहे.
दिनांक 26 जानेवारीच्या मध्य रात्री 12 वाजताच्या दरम्यान वनविभाग पथक गस्त घालित असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपक्षेत्र चिमुर नियतक्षेत्र गदगाव कक्ष क्रमांक 372 येथे रेती उत्तखनन करुण वाहतुक करीत असताना ट्रक्टर क्रमांक एम एच 34, एल 5391 मालक मारोती मुरलीधर निखाडे झरी, एम एच 34, ए पी 2926 मालक मोकिन गब्बर पटेल चिमुर, एम एच 34 एल 3293 मालक प्रकाश तुकाराम फुलझले, तीन ट्रक्टर सापडले असून तिन्ही ट्रकटर वर कार्यवाही करीत वनविभाग चिमुर येथे जमा करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही क्षेत्र सहाय्यक रमेश नरड यांचे नेतृत्वात वनरक्षक आर डबलू हजारे, ए एम मेश्राम, चांगदेव चिंचुलकर यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे,