जि प प्राथमिक शाळा नांद येथील विद्यार्थ्यांकडून गावातील नागरिकांना स्वच्छतेचे धडे

ज
प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के
स्वच्छता म्हणजे फक्त आपल्या घराची किंवा परिसराची साफसफाई करणे इतकेच मर्यादित नाही.ती एक वृत्ती आहे ती एक जीवनशैली आहे.ज्याप्रमाणे आपण श्वास घेतो, पाणी पितो. त्याचप्रमाणे स्वच्छता ही देखील आपल्या जगण्यासाठी एक मूलभूत गरज आहे. स्वच्छता हे मूल्य वाचून चालणार नाही,तर ते मूल्य स्वतः मध्ये रुजवून कृती करणे हे होय.म्हणून भिवापूर तालुक्यातील जि प प्राथमिक शाळा नांद क्र 1 (मुले ) या शाळेत.”माझ गाव स्वच्छ गाव” या उपक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापण समिती, पालक वर्ग, गट ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व शाळेतील शिक्षक यांची सभा आयोजित करण्यात आली.

यावेळी सरपंच शितल राजूरकर, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहन धारणे,उपाध्यक्ष शितल बारेकर,शिक्षक सुभाष नन्नावरे, कुंदा घोडमारे,ग्रामपंचायत सदस्य सदू हिवरे,विजय रामटेके, रवींद्र धाडसे, आशिष शिवरकर, विलास रुईकर,ग्रामसेवक भारत मेश्राम पालक संदीप मेश्राम, पिंटू डावे, महेंद्र कोल्हे,रुपेश शिवरकर, सूर्यकांता चाचेरकर, रितेश हिवरे, संदीप शेरकी, रोशन शिवरकर इत्यादी उपस्थित होते.या सभेत काही मुद्दे शाळेतील शिक्षक सुभाष नन्नावरे यांच्याकडून पटवून देण्यात आले. त्यापैकी अस्वच्छता असेल तर रोगराई पसरते, वातावरण दूषित होते. आणि त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. निरोगी मन यासाठी स्वच्छतेचि नितांत आवश्यकता आहे. “स्वच्छ भारत अभियान” हे याचेच एक उत्तम उदाहरण आहे. या अभियानाने आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे आणि केवळ सरकारच नव्हे तर प्रत्येक नागरिकांची यामध्ये भूमिका आहे हे दाखवून दिले आहे. मी एक विद्यार्थी आहे आणि मला वाटते की स्वच्छतेची सुरुवात ही आपल्यापासूनच व्हायला पाहिजे. कारण आजचा विद्यार्थी हा देशाचा भविष्यातील उत्तम नागरिक होणार आहे. म्हणून स्वच्छतेचे मूल्य हे लहानपणापासून रुजवणे हे आजच्या काळाची गरज आहे.पालकांनी विद्यार्थ्यांनी गावाची स्वच्छता करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. घर ते शाळेपर्यंत येणाऱ्या वाटेत जेवढा कचरा विद्यार्थ्यांना दिसेल तो पिशवीत गोळा करणे.घर परिसरातील कचरा पालकांनी गोळा करणे.त्याचे शाळेत संकलन करणे. व त्या कचऱ्याची विल्हेवाट गट ग्रामपंचायत यांनी लावणे.
इत्यादी संकल्पना स्वच्छतेबाबत ठरविण्यात आल्या. आणि या संकल्पनेची सुरुवात दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांनी कचरा गोळा करून दाखविली.









