भिमाशंकर वैराळे यांची जमिन अधिकार अंदोलनाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक22फेब्रुवारी 2022
मानवी हक्क अभियान प्रणित जमिन अधिकार अंदोलनाच्या जिल्हा अध्यक्षपदी भिमाशंकर वैराळे यांची नियुक्ती मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके यांनी केली आहे.
22 फेब्रुवारी 2022 रोजी मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो डाॅ मिलिंद अवाड साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मानवी हक्क अभियान च्या जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत भिमाशंकर वैराळे सर्व कार्यकर्त्यांनी एक मताने निवड केली आहे.
भिमाशंकर वैराळे हे गेल्या 15 वर्षापासून मानवी हक्क अभियान च्या अनेक पदावर काम केलेले त्यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
या निवडीबद्दल मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो डाॅ मिलिंद अवाड साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादा साहेब क्षीरसागर, राज्य सचिव, दिलिप तायडे, राजेश घोडे, मच्छिंद्रभाऊ गवाले,अंकुश सोनवने,भारत बळवंते,संतोष लोखंडे अदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
सदर बैठकीला मुंजाभाऊ उफाडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मीनाताई आवचार, दादाराव कांबळे,अजय हिवाळे, गणेश जोगदंड मारोती नवगिरे, उतमराव झिंझुर्डे, देविदास कांबळे, देविदास खंदारे,दिपक भालेराव, संदीप कांबळे, अदीची उपस्थिती होती.