आदिवासी समाजातील प्रतिनिधींनी 5 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
आ

प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के भिसी
Ø कला व संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक
दि. 03 : 26 जानेवरी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी आदिवासी समाजातील 2 प्रतिनिधी एक महिला व एक पुरुष यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी चंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुर, बल्लारपुर, राजुरा, गोडपिंपरी, कोरपना, जिवती, मुल, सावली, सिंदेवाही, पोंभुर्णा व चिमुर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चिमुर, ब्रम्हपुरी, नागभिड, वरोरा, भद्रावती ह्या तालुक्यातील आदिवासी समाजातील 60 वर्षा पेक्षा कमी वयोगटातील कला आणि संस्कृतीचे पुरेसे ज्ञान असलेले इच्छुक पुरुष महिला उमेदवारांनी नाव, पत्ता आणि दुरध्वनी क्रमांकाचा उल्लेख असलेले अर्ज 5 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.
अर्जासोबत ओळखपत्र, चारित्र्यप्रमाणपत्र (जिल्हा पोलीस अधिक्षकाचे यांचेकडून), वैद्यकिय प्रमाणपत्र (जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून), जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, (सरपंच सचिव), दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे .









