ताज्या घडामोडी

आंदोलनाच्या धसक्यामुळे BHEL प्रकल्प झाला जीवंत

ग्रामीण प्रतिनिधी : टिकेस्वर चेटुले दिघोरी

सतत ८ वर्षांपासून रखडलेला BHEL प्रकल्प रद्द झाल्यासारखाच होता परंतु २६ सप्टेंबरचा आंदोलनाच्या धसक्यामुळे आता सुरू होण्याचे मार्ग नक्कीच विचाराधीन झाले यात मुळीच शंका नाही, यासाठी दिल्ली वरुन उद्योग भवन कार्यालयातुन दखल घेण्यासाठी सक्षम अधिकारी आंदोलन स्थळी आले होते, त्यांनी २६ सप्टेंबरला आंदोलन स्थळी घडलेल्या प्रत्यक्ष मोक्यावरच्या घटना डोळ्यांनी बघीतल्या, हे अधिकारी नक्कीच सत्य परिस्थिती आपल्या अहवालात शासनाला सादर करतील, जिल्ह्यात कोरोणा नसतांना सुध्दा २६ सप्टेंबरला होणारा भव्य विराट तेज आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी मोठ्या संख्येत लोकांचा ताता आंदोलन स्थळी येने सुरूच होते परंतु शेकडोंच्या संख्येत असलेल्या पोलिसांनी लोकांना आंदोलन स्थळावर येऊच दिले नाही, म्हणून BHEL प्रकल्पाला लागून असलेल्या परीसरात जमलेले लोक खूप आक्रोश मध्ये होते, आंदोलनाचे जनक राजेंद्र पटले यांना २४ तासांच्या आत कोणत्याही परिस्थितीत उचलून अटक करण्याचे फर्मान पोलिस यंत्रणेला कडक शब्दात देण्यात आले होते, म्हणून आदल्या रात्री १ वाजता तुमसर येथील राजेंद्र पटले यांच्या निवासस्थान पोलिसांनी घेराव करून ठेवले होते व कुलूप लावलेल्या बंद गेटच्या आत मध्ये प्रवेश करून मोठमोठ्याने दार खटखटवत होते, परंतु दार उघडण्यात आले नाही, रात्रभर पोलिस राजेंद्र पटले यांच्या निवासस्थानावर त्यांना उचलण्यासाठी पहारा देत होते, परंतु राजेंद्र पटले शेवटी आंदोलन स्थळावर गेलेच, BHEL च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आंदोलन स्थळावर जात असताना थरारक पध्दतीने त्यांना कसून दबोचण्यात आले तो दृश्य शरीरावर काटे उभे करणारा होता, शेवटी पोलिस स्टेशन लाखनी येथे त्यांना आणण्यात आले, परंतु लगेच हज्जारोच्या संख्येने लोक पोलिस स्टेशन लाखनी येथे दाखल झाले व बेकाबू होऊन जोर जोराने चिडून नारेबाजी करत राहिले, बेकाबू लोकांचा आक्रोश बघून राजेंद्र पटले यांना भंडारा कडे घेऊन जाण्याचा डाव पोलिसांनी रचला, आणखी लोक खूप चिडून रात्रीच्या ८ वाजेपर्यंत पोलिस स्टेशनच्या समोर दटुन नारेबाजी करतच होते, यात प्रामुख्याने माता भगिनींची संख्या भरपूर होती, राजेंद्र पटले यांना सोडा ते जनतेच्या व बेरोजगार तरुणांच्या हितासाठी देवाने पाठविलेले दुत आहेत असे नारे देत होते, असा तो भाऊक क्षण होता अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, मोठ्या मोठ्या अडचणींना तोंड देऊन शेवटी BHEL प्रकल्प सुरू करण्याची जिद्द एक दिवस पुर्ण होईलच !

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close