ताज्या घडामोडी

मानवत रोड रेल्वे स्टेशन येथे मनमानी कारभार याबद्दल मानवत रोड स्टेशन प्रबंधक यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मानवत रोड रेल्वे स्टेशन येथे मनमानी कारभार याबद्दल मानवत रोड स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले..
मानवत रोड रेल्वे प्रवाशांना मदत करण्याऐवजी रेल्वे प्रवाशांची लूट व अडवणूक होत आहे. प्रवाशांना सोडवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना नियमबाह्य पाच रुपये घेण्यात येत आहेत.त्यांना अरेरावीची भाषा वापरण्यात येत आहे.अपंग व्यक्तींना रेल्वे स्टेशन मध्ये जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.रेल्वे स्टेशन मध्ये आडवी मोठ मोठी दगडे टाकलेली आहेत त्यामुळे बरेच प्रवासी पडून जखमी झालेले आहेत.या सर्व बाबी येत्या दोन दिवसात बंद ना झाल्यास व वाटे मधील दगडे ना हटवल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देण्यात आले..
या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख अनिल जाधव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड रामराजे महाडिक यांच्यासह सतिश मगर, पांडुरंग सत्वधर, गणपत सिसोदे, सुरज जंगाले, अनिल दहे, रियाज शेख, सचिन शिंदे, पिंटू अंभोरे, माणिक चव्हाण, कृष्णा देशमाने, पांडुरंग बुरकुले, सोनू खरात, भगवान तुरे, सांगू कोळी, तुकाराम चव्हाण, संतोष जंगले इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close