ताज्या घडामोडी

अप्पर पोलीस अधीक्षक यांची साईबाबा जन्मस्थान मंदिरास भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आदरणीय यशवंतरावजी काळे सर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्रद्धेने साईबाबांचे दर्शन घेतले . मोठ्या आस्थेने मंदिराची माहिती घेतली.“ मंदिरास भेट दिल्यानंतर मन प्रसन्न झाले संपूर्ण परिसर व मंदिर अतिशय सुरेख आहे” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले .श्री साई स्मारक समितीच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने नामांकित वकील कालिदासराव चौधरी विश्वस्त श्री साई स्मारक समिती, यांच्या शुभहस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी साई मंदिराचे एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी, पाथरी पोलीस स्टेशनचे पीआय राहिरे, स.पो.नि. आलेवार, सुरेश कदम
पो. ना. डॉक्टर मानवतकर ,मंदिर अधीक्षक सौ छाया कुलकर्णी, अजय पाथरीकर शास्त्री, जयंत चिटणीस, गोविंद पाथरीकर वगैरे उपस्थित होते.
अशी माहिती साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी एडवोकेट मुकुंद दिनकरराव चौधरी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close