एकता हे राष्ट्राची महान शक्ति आहे== मोहम्मद शफि फारूकी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
एकता ही राष्ट्राची महान शक्ती आहे. तीच आमची खरी देशभक्ती आहे. तीच राष्ट्राचा आत्मा आहे. केवळ एकत्रितपणे आम्ही देशाच्या योजना पूर्ण करू शकतो. केवळ देशाची एकताच कृषी, उद्योग आणि विज्ञान क्षेत्रात आपल्या प्रगतीची दारे उघडू शकते. आपल्या ऐक्याचे सामर्थ्य पाहून शत्रू आपल्यावर हल्ला करण्याचे धाडस करू शकत नाहीत.. जमाते इस्लामी हिंद चे मोहम्मद शफिक फारूकी यांनी असे प्रतिपादन केले…
मानवत येथे जमाते इस्लामी हिंद च्या वतीने ईद मिलन व मस्जिद परीचय या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 24 मे रोजी पेठ मोहल्ला परिसरातील मर्कज़ मस्जिद येथे संपन्न झाला…
यावेळी प्रमुख उपस्थिती
मुफ्ती इसाक साहाब
धर्मगुरु मानवत, मा.स्वप्निल पवार साहेब गट विकास अधिकारी मानवत, मा.प्रकाश राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक मानवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, मा.डि.आर. रणमाळे गटशिक्षणाधिकारी पं.स.मानवत, अँड.सतिश बारहाते, मा.शाम झाड़गावकर अध्यक्ष पत्रकार संघ मानवत, मा.शिरीष लोहट
केंद्र प्रमुख मानवत, मा.विलास मिटकरी आदर्श शिक्षक मानवत, मा.विलास खरात, मा.सालार पटेल जेष्ठ सदस्य जमाते इस्लामी हिंद परभणी,
मा.शाकेर खान साहाब जिल्हाध्यक्ष जमाते इस्लामी हिंद परभणी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नजात पठाण सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन माजी नगरसेवक हबीब फडके यांनी मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेख समीर, मुदस्सीर, सरफराज़, नयामत खान, सलीम सर बागवान, हबिब भडके, कलीम खान, आलिम खान, समाजसेवक शेख मुस्ताक, जमाते इस्लामी हिंद चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले