ताज्या घडामोडी

मौजा रेंगाबोडी येथे सरकारी स्वस्त धान्य दुकानचे उद्घाटन


प्रतिनिधी:हेमंत बोरकर

दिनांक 24/12/2023 रोज रविवार ला सकाळी 1.30 वाजता मौजा रेंगाबोडी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील संतोषीमाता स्वयं सहाय्यता समुह यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व तहसील कार्यालय चिमूर यांचे अंतर्गत कृतिसंगम कार्यक्रमातून सरकारी स्वस्त धान्य दुकानचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास तालुका व्यवस्थापक कू. रजनी खोब्रागडे, प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर, समता महिला प्रभाग संघ खडसंगी मुरपारच्या अध्यक्ष सौ. संगिता ज्ञानेश्र्वर थुटे, गावातील सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, रोजगार सेवक, समुदाय संसाधन सौ.पुष्पा शंकर थुटे, सौ.काजल राहुल पाटील, सौ.ममता अरविंद सरपाते, सौ.वर्षा खेमराज थुटे व गावातील महिला उपस्थित होत्या..

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close