साप पकडताना सर्पमित्राच्या हाताला केला सापाने दंश
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
गोंडपीपरी तालुक्यातील मौजा विठ्ठलवाडा येथील सर्पमित्र टिकाराम डाहुले याला सापाने दंश केल्याची घटना आज दि.11 नोव्हेंबर रोज गुरवारला विठ्ठलवाडा येथे घडली आहे.
विठ्ठलवाडा येथील नंदकिशोर अवथरे यांच्या घरी साप असल्याची माहिती सर्पमित्र टिकाराम डाहुले यांना दिली असता ते अवथरे यांचे घर गाठून सर्प शोधण्यास सुरवात केली असता तो साप चक्क पपई च्या झाडावर दडून बसला असल्याने सर्प पकडताना त्याला मोठी कसरत करावी लागली.जवळपास तीस ते चाळीस पपई तोडाव्या लागल्या. अश्यातच साप पकडत असताना त्याच्या हातात सापाने दंश केल्याची घटना आज दि 11 नोव्हेंबर रोज गुरवारला घडली आहे.
दंश केलेला साप हा धामण असल्याने व बिन विषारी असल्या कारणाने सर्पमित्र डाहूलेंनी कोणताही प्राथमिक उपचार केला नाही.
त्यांच्या हातात धामण सापाने दंश करून सुद्धा त्यांनी अवथरे यांच्या घरी असलेल्या धामण प्रजातीच्या सापाला पकडले आणि एका डब्यात बंद करून निसर्ग मुक्त करण्यात आले.