वरोरा उपजिल्हा रुग्णालयात क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व सुरक्षित मातृत्व दिवस साजरा

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
मंगळवार दि. ११ एप्रिलला तालुका विधी सेवा समिती वरोरा व उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतिबा फुले जयंती व सुरक्षित मातृत्व दिवस वरोराच्या उपजिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला सहदिवाणी न्यायाधिश तथा न्याय दंडाधिकारी( प्रथम श्रेणी) के.के.खोमने , वरोरा तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक अंकुश राठोड,अधीसेविका वंदना विनोद बरडे आदीं मान्यवर मंडळी उपस्थित होती. आरंभी मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकुश राठोड यांनी केले .त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाची व पिसिपिएनडिटी संदर्भात माहिती विषेद केली. सरदिवाणी न्यायाधिश के .के.खोमने यांनी आजच्या कार्यक्रमात कायदे विषयक बाबतीत इत्यंभूत माहिती दिली.व उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले.आयोजित कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरोग्य सहाय्यक सतिस येडे यांनी केले.अधीसेविका वंदना विनोद बरडे यांनी आपल्या भाषणातून महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकत सुरक्षित मातृत्व दिवस हा किती महत्वाचा असतो हे या वेळी पटवून दिले . कार्यक्रमाला वरोरा जिल्हा उप रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते. उपस्थितीतांचे आभार वंदना बरडे यांनी मानले. वैद्यकीय अधीक्षक डॉ .अंकुश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिसेविका वंदना बरडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले जयंती व सुरक्षित मातृत्व दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले होते . आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीसेविका कापटे ,परीसेविका पुसनाके परीसेविका सूजाता जूनघरे ,सोनल दांडगे, किरण धांडे ,रत्नमाला ढोले, किरण वांढरे, स्नेहा स्वप्नील वंजारे, स्वाती जूनारकर आदीं महिलांनी अथक परिश्रम घेतले.