ताज्या घडामोडी

विवाह संस्था टिकून राहीली तर समाजव्यवस्था व भारतीय संस्कृती टिकेल -आ. किशोर जोरगेवार

महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार उपवर – उपवधू परिचय मेळाव्याचे पडोलीत आयोजन

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

रितीरिवाजाने होणा-या विवाह पद्धतीवर बाहेरच्या परदेशी संस्कृतीचे आक्रमण होत आहे. अशा वेळी भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी परिचय मेळाव्यांची नितांत गरज आहे. सुतार (झाडे) समाजाच्या वतीने आपण दरवर्षी उपवर – उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करत आहात. ही समाज प्रबोधनासाठीही आवश्यक बाब असुन अशा विवाह संस्था टिकून राहल्या तरच समाजव्यवस्था व भारतीय संस्कृती टिकेल असे प्रतिपादन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघाच्या वतीने पडोली येथे उपवर – उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर राखुंडे, राज वांढरे, आनंदराव बुरडकर, राजेश रासेकर, सुनिता पिंपळकर, डॉ. ज्योती राखुंडे, सतीश माणुसमारे, माधुरी शास्त्रकार, ज्योती झाडे, अरुणा झाडे, रविंद्र बुरडकर, राहुल नवघरे, पराग झाडे, विशाल कायरकर, मिना माणुसमारे, गौरव मामीडवार, महादेव वाढई, गुणवंत राजुरकर रामदास नवघरे आदिं मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, सामाजिक कार्यक्रमातून समाज एकत्र येत असतो. त्यामुळे अशा आयोजनांची गरज आहे. यात सातत्य असल पाहिजे. विशेषतः अशा आयोजनात समाजातील युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. त्यामुळे समाजाचे विचार या माध्यमातुन युवकांपर्यंत पोहचविण्याचेही मोठे मंच असे आयोजन ठरु शकतात. यातून युवकांना दिशा मिळू शकते. समाजातील यशस्वी व्यक्तींचा जिवनप्रवास आपण अशा आयोजनातून युवकांना सांगीतला पाहिजे. समाजाला नवी दिशा देण्यासाठी युवाकांच्या कल्पना, संकल्पना आपण विचारात घेतल्या पाहिजे.
छोटे समाज हे सेवेकरी समाज आहे. मात्र दुस-यांची सेवा करताना आपण मागे राहिलो ही सत्य परिस्थिती नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे आता ही परिस्थिती बदलविण्याची गरज आहे. सरकारी नौकरीच्या शोधात राहण्यापेक्षा आपण आपल्या पांरपारिक व्यवसायकडे वळले पाहिजे. आपल्या हाताला परमेश्वराने कला दिली आहे. याचा योग्य उपयोग करुन पारंपारिक व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देत रोजगार देणा-यांच्या भुमिकेत आपण येण्याची गरज असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. कार्यक्रमात अनेकांना आपला आयुष्यभराचा जोडीदार मिळणार आहे. याबदलही आमदार जोरगेवार यांनी उपवर आणि उपवधुंना शुभेच्छा दिल्यात. सदरहु कार्यक्रमात समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close