ताज्या घडामोडी
चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा


प्रतिनिधीः योगेश मेश्राम
दिनांक 26 जानेवारी 2024 रोज शुक्रवारला ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .मार्गदर्शन करताना डॉ. अमीर धमानी यांनी प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि विद्यार्थ्यांना आपल्या अधिकारांबरोबरच देशासाठी आपल्या कर्तव्यांची जाणीव सुद्धा असली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांद्वारे देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना मिठाई वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आजी- माजी विद्यार्थी उपस्थित होते.