वरोरा शिक्षक पतसंस्थेत लायक जेष्ठ महिला कर्मचाऱ्याला सेवेतून काढून अन्याय
आमसभेत सभासदांच्या रोषाला निरुत्तर होवून संचालक मंडळाने काढला पळ
तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा शिक्षक सह.पतसंस्थेत सौ.संगीता वरघने ह्या महिला कर्मचारी दि. १७/४/२०१७ पासून गेले चार ते पाच वर्ष संगणक आॕपरेटर म्हणून कार्यरत होत्या. पतसंस्थेचे सर्व सदस्य याचे साक्षदार आहे. त्यांनी ही पतसंस्था संगणीकृत करण्यात फार मोठे परिश्रम घेतले व सर्व व्यवहार सुरळीत केले. ५०% महीला सदस्य असणाऱ्या या पतसंस्थेत आपली महिला कर्मचारी असल्याने सर्व महीला सदस्यांना आपुलकी होती तथा कसलीही चिंता वाटत नव्हती. परंतु या पतसंस्थेने ‘गरज सरो वैद्य मरो’ या युक्तीप्रमाणे या महिला कर्मचाऱ्याला तडकाफडकी काढून टाकून तिच्या प्रपंचाची वाट लावून फार मोठी वाताहात केली. संचालक मंडळाने लायक कर्मचाऱ्याला काढून स्वतःचे हितसबंध जपण्यासाठी एका अल्प शिक्षित नववा वर्ग शिकलेल्या शिपायाला क्लर्क पदावर बढती देवून सहकार खात्याचे, संगणकाचे ज्ञान नाही अशांची कसलीही लायकी न बघता बढती देवून स्वतःचे भले करुन पतसंस्थेचे अहीत केले आहे. करोडोचा व्यवहार असलेल्या या पतसंस्थेतील संभासदांना आपला पैसा असुरक्षीत वाटत आहे.गेल्या चार वर्षापासून कार्यरत असलेल्या सिनीअर कर्तव्यदक्ष व संगणकाचे इतंभू ज्ञान असलेली कार्यरत चार इतर वीस तीस हजार पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम एकट्याने सांभाळणारी ही महीला कर्मचारी अवघ्या सात हजार पगारावर राबराब राबून पुढील आपल्या भविष्याच्या आसेवर आपल्या प्रपंच मुलाबाळाची स्वप्न बघत होती.परंतु पतसंस्थेच्या या निष्ठूर स्वार्थी व भ्रष्ट संचालक मंडळाने या महीलेला धोका दिला व तिला काढून टाकून तिच्या स्वप्नाचा व भावी आयुष्याच्या प्रपंच्याचा चुराडा केला. सदर लायक महिला कर्मचारी कार्यरत असतांना संचालक मंडळाने तिला डावलले.आपल्या हितसबंधातील कसलीही योग्यता अनुभव तथा परिक्षा न घेता व आमसभेची मंजुरी न घेता सर्व सभासदांना अंधारात ठेवून क्लर्क पदासाठी दावेदार असलेल्या सदर महिलेला डावलण्यात आले. अल्पशिक्षित शिपायाला क्लर्कची बढती देवून नवीन शिपाई नेमला. सदर पतसंस्थेतील संगणक तथा उच्च शिक्षित एकमेव सिनीअर असलेल्या महिला कर्मचाऱ्याला दि.१८/७/२०२१ ला तडकाफडकी कसलेही कारण नसतांना सेवेतून काढून टाकले हा सारासार सदर महिलेवर घोर अन्याय आहे. दि. ८/८/२०२१ च्या आॕनलाईन पतसंस्थेच्या आमसभेत अनेक सदस्यांनी सदर महिला कर्मचाऱ्याला काढल्याबाबत प्रश्न उपस्थित केला परंतु संचालक मंडळ निरुत्तर होवून सभासदांचे समाधान करु शकले नाही. कोणतेही कारण नसतांना कर्तव्यदक्ष महीला कर्मचाऱ्याला काढून नवव्या वर्ग शिकलेल्या अशिक्षित शिपायाला बढती देने व नवीन शिपायाची भरती करणे हे कोणत्याही सुज्ञ सभासदाला न पटणारे होते. अनेकांनी या संचालक मंडळावर ताशेरे ओढून प्रश्नचिन्ह उपस्थित केले सर्वांनी एकजुटीने सदर महिलेला न्याय द्यावा अशी मागणी केली. पतसंस्थेतील सदर प्रकार हा मानवाधिकाराचे हनन असून सदर महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे तथा न्यायपालीकेत पतसंस्थेच्या संचालक मंडळा विरोधात दाद मागून न्याय मिळवून देण्याचा सर्व सदस्यांचा निर्धार दिसून आला. संचालक मंडळाच्या सदर गैरप्रकाराने संस्थेच्या महिला सदस्या तर अतिशय दुःखी दिसुन येत होत्या.अनेक महिला सदस्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.