जिल्हास्तरीय आदिवासी मेळावा

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
गडचिरोली जिल्हा गोटूल समिती व आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने………
जिल्हा स्तरीय आदिवासी मेळावा
महाराजा सेलिब्रेशन हॉल,धानोरारोड,गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले.
या मेळाव्याचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी उत्कृष्ट सविस्तर आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले.

या मेळाव्याला प्रामुख्याने खासदार अशोक नेते,यांनी सुद्धा आदिवासी बांधवाना मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार डॉ.देवराव होळी,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,नंदूभाऊ नरोटे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,डॅा.नामदेव उसेंडी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,अविनाश पाल, मारोतराव इचोळकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नरेशचंद्र काथोडे,गोवर्धन चव्हाण, लताताई पुन्घाटे,वर्षा शेडमाके, कुमरे साहेब, एम.एम.आत्राम साहेब,मोहन पुराम तसेच पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.