शेकडो आदिवासी गोवारी समाज बांधवांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
चामोर्शी तालुक्यातील मौजा शांतीनगर येथे आदिवासी गोवारी समजाच्या वतीने 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथील हत्याकांडात शहीद झालेल्या 114 गोवारी बांधवांना तालुक्यातील शेकडो गोवारी बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ज्यांच्यामुळे आज जगाच्या पाठीवर आदिवासी गोवारी समाजाची एक वेगळी ओळख झाली अशा 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथे शहीद झालेल्या 114 आदिवासी गोवारी शहिदांचा इतिहास जागृत करून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शांतीनगर भव्य स्मारक उभारण्याच्या निर्णय घेतला.
या शहीद दिनानिमित्ताने या स्मारकाचे भूमिपूजन श्री. प्रा.ज्ञानेश्वर नेवरे सर, साईभाऊ नेवारे माजी उपसरपंच घोट यांच्या हस्ते झाले.

गोवारी समाजाला आदिवासी समाजातील सवलती मिळण्यासाठी 23 नोव्हेंबर 1994 ला विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये प्रशासनाकडून झालेल्या चेंगराचेंरीत 114 गोवारी बांधव शहीद झाले.27 वर्षे लोटूनही या गोवारी समाजाला आदिवासी समाजातील सोयी मिळाल्या नाहीत,जोपर्यंत या सुविधा मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या हक्कासाठी लढत राहू असे प्रतिपादन आदिवासी गोवारी समाजाचे तालुका सचिव संदीप भाऊ नेवारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी गोवारी समाज संघटना तालुका चामोर्शीचे सचिव श्री. संदीपभाऊ नेवारे,उपाध्यक्ष दिलीप नेवारे,देवराव खंडरे,राकेश नेवारे,प्रमोद खंडरे, मुर्लीधर सरवर,निळूजी बोटरे आणि गावातील नागरिक,सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आदिवासी तालुका मुख्य संघटक श्री विश्वनाथजी बोटरे यांनी केले तर आभार जीवन सरवर यांनी मानले.