ताज्या घडामोडी

मेंडकी येथे शेतात विज पडून शिक्षकाचा जागीच मृत्यु

ग्रामीण प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे मिंडाळा

मेंडकी येथे शेतात काम करत असतांना संजय जयस्वाल यांच्या अंगावर विज पडून त्यांचा जागीच मृत्यु झाला.
संजय जयस्वाल हे लोकसेवा विद्यालय सिंदेवाही येथे शिक्षक होते कालच दिनांक ३१ मे २०२१ ला रिटायर्ड झाले घरी रीकामे राहाण्यापेक्षा शेतात जाऊन काही काम कराव म्हणुन ते आज दिनांक १ जुन २०२१ ला शेतात जाऊन शेतातील काम करत होते काम करत असतांना अचानक गळगळाट सुरू झाला व त्यांच्या अंगावर विज पडली तिथेच त्यांचा जागेवरच मृत्यु झाला त्याच्या परिवारावर शोककळा पसरली त्यांच्या मागे खुप मोठा आप्त परीवार आहे त्यांच्या मृत्यु मुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close