ताज्या घडामोडी

पाथरी विधान सभा मतदार संघातील आमदार श्री सुरेशराव वरपुडकर साहेब यांच्या वतीने दिव्यागांना मोफत ट्रायसायकलचे वितरण

जिल्हा .प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या वतीने दीव्यागांना मोफत ट्रायसायकलचे वितरण जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी महापौर अनिता सोनकांबळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.एस.नागरगोजे, डॉ.गौरिष साळुंके, मराठवाडा दिव्यांग संघटना अध्यक्ष राहुल शिवभगत, संजय वाघमारे, रामभाऊ घाडगे, धोंडीराम चव्हाण, उपमहापौर भगवानराव वाघमारे, प्रेरणाताई वरपूडकर, गटनेते माजू लाला, नदीम इनामदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.वरपुडकर यांनी सांगितले की, मतदार संघात जवळपास मोती बिंदुचे 2500 ऑपरेशन झाले असुन जवळपास १८०० महिलांचे गर्भाशयाचे ऑपरेशन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केले आहेत. अनेक इतर दुर्धर आजारांवर सर्जरी जे.जे. हॉस्पीटल, ससुन हॉस्पीटल, भारती विद्यापीठ यांच्या मदतीने केल्या असुन त्या करीता आमची ९ ते १० आरोग्य सेवकांची टीम संपुर्ण मतदार संघात कार्यरत आहे. मागील एक वर्षापासुन covid मुळे आरोग्य शिबीरे स्थगीत करावी लागली. परंतु लवकरच जि.प.सर्कल निहाय पुन्हा आरोग्य शिबीर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कॅन्सर डिटेक्शन, नी प्लेसमेंट, कर्णबधीरांसाठी श्रवण यंत्र, जयपुर फुटसचा कॅम्प इत्यादी रुग्णांवर उपचार व आवश्यकता असल्यास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. डोळयाची कॅटरॅक ऑपरेशन सध्या कोव्हीड- 19 मुळे सर्व रुग्णालयांत बंद आहेत. परंतु, ती सुरू झाल्या नंतर राहिलेल्या सर्व रुग्णांची मोतीबिंदु शस्त्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहेत. आमच्या याच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ताडबोरगाव येथील नवजात शिशुच्या ह्दयाला छिद्र असल्याने त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असुन तो ही रुग्ण आता चार वर्षाचा असुन ठणठणीत आहे. ग्रामीण भागातील कॅन्सर, ऱ्हदय रोग व इतर दुर्धर रोगाने ग्रस्त रुग्णांना कोणत्या हॉस्पीटल मध्ये जावे या विषयी डॉक्टराच्या आपॉइनमेंट घेऊन त्यांना दाखल करण्यासंबंधी आमची टिम त्यांना दवाखान्यात ॲडमिट करुन शासनाच्या विविध योजनेतून लाभ देऊन रुग्णांना आर्थिक भुर्दंड होऊ न देता मंबई, पुणे शहरांसारख्या ठिकाणी रुग्णांना मदत करत असतात. आज याच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी मोटाराईजड ट्रायसायकलचे वाटप भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम, कानपुर यांच्या सहकार्याने करण्यात आले.
आज कोव्हीड- 19 च्या पार्श्वभूमीवर ६३ दिव्यांगाना ज्यांचे अपंगत्व ८०% पेक्षा जास्त आहे अशांना ट्रायसायकलचे वाटप झाले आहे. परंतु, लवकरच ८०% पेक्षा कमी अपंगत्व असलेल्या अपंगाचीही तपासणी करुन त्यांना सुध्दा आम्ही ट्रायसायकल उपलब्ध करुन देणार आहोत. परभणी शहरातही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामधुन ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर असुन ४ आरोग्य केंद्र कार्यान्वित झालेली आहेत असे आ.वरपुडकर यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी श्री.दिपक मुगळीकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे व युवा नेत्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ प्रेरणाताई वरपुडकर व सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते ट्रायसायकलचे वाटप करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close