सामान्य कामगारांसाठी मुल येथे कामगार हित मार्गदर्शन मेळावा संपन्न
प्रतिनिधी:अहमद अन्सारी
सामान्य कामगार सेवा व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने मुल, चंद्रपूर येथे सामान्य कामगार, बाजार समिती हमाल,खाजगी चौकीदार,सुरक्षा गार्ड,पेट्रोल पंप कर्मचारी, राईस मिल मजूर,भांडी – कपडे मोलकरीण,फुटपाथ व्यावसायिक यांचे हित, आरोग्य,अधिकार,हक्क,विमा – अपघात विषयक मार्गदर्शन कामगार मेळावा 15 डिसेंबर 2023 रोजी हेडगेवार सभागृह, धनश्री बँक हॉल,मुल, चंद्रपूर येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय लोकहीत सेवाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच संस्थापक – सचिव – फॅमिली वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी, तथा अध्यक्ष – पुरूष हक्क संरक्षण समिती, पुणे ॲड. संतोष शिंदे, पुणे,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष श्री हेमंत सोनारे चंद्रपूरचे वकील श्री पुरुषोत्तम सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजय नळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
कमिटी आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याला तीनशे सव्वातीनशे लोकांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे श्री.हेमंत सोनारे, औद्योगिक सेल चे प्रदेशाध्यक्ष यांनी कामगार बंधूंना त्यांच्या हक्क व अधिकाराविषयी मार्गदर्शन करून त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरू करून प्रशिक्षण देण्यासाठी आश्वासन देखील यावेळी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे ॲड. संतोष जी शिंदे यांनी कामगार बंधू,माता – भगिनींना आपल्या परिवाराची तसेच परिवारातील सर्वांची काळजी कशी घ्यावी याबाबत मागदर्शन केले. व्यसनापासून दूर राहून आपले आरोग्य जपण्यासाठी आपण कसे वागले पाहिजे, आपल्या मुला बाळाना उच्च शिक्षण देवून त्यांना जागृत नागरिक बनविले तरच देशाचे हित साध्य होऊन युवा अधिक पिढी सक्षम होईल आणि पर्यायाने देशाची प्रगती होऊन जगामध्ये वाखानली जाणारी आपली भारतीय परीवार संस्था टिकेल व परीवार कल्याण साधण्यास मोलाची साथ मिळेल.तसेच कामगारांनी आपल्या हक्क व अधिकाराविषयी जागृत राहिले तर त्यांच्या व त्यांच्या परीवार जणांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. त्याच प्रमाणे व्यसनापासून दूर राहून आपले आरोग्य जपावे त्याच सोबत शिक्षणावर भर द्यावा, घरातील माता भगिनींना प्रत्येक कामात, कार्यात साथ देवून आपला परीवार सुरक्षित होण्यासाठी सज्ज राहावे यामुळे आरोग्य, स्वास्थ उत्तम राहिल्याने अनावश्यक खर्च कमी होवून परीवार कल्याण साधण्यास मदत होईल याबाबत ऍड. संतोष शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.रोहित शिंगाडे,श्री संजयजी धुल सामाजिक कार्यकर्ता, श्री करण कामटे,अनिल निकोड, राहुल प्रेमलवार, मधुकर मोहुरले, कैलास वाडगुरे, सौरभ वाडई, मंथना ननावरे, ॲड. पुरुषोत्तम सातपुते, भूषण मोरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन औद्योगिक कामगार सेल चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष – श्री. दत्तात्रय समर्थ यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू गुरनुले यांनी तर सूत्रसंचालन सौ.नलिनी आडपवार यांनी केले व आभार सौ. शामला बेलसरे यांनी मानले. यासाठी श्री. दत्तात्रय समर्थ यांच्यासह सौ.स्मिता पेरके, विनोद आंबटकर, चंद्रकांत चटारे, सौ. फरजाना शेख आदींनी अथक परिश्रम घेतले .