भिसी येथे विविध संस्थाच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
छत्रपती शाहु महाराज बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी
जिविका इंग्लिश मिडियम स्कूल भिसी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले

टायगर ग्रुप शाखा भिसी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
आदर्श जनता कनिष्ठ महाविद्यालय भिसी
बजरंग दल शाखा भिसी यांच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाने भव्य शोभायात्राचे आयोजन

दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवार ला भिसी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती भिसी यांच्या वतीने बाजार चौकातील व्यासपीठावर महेश मैंद प्रस्तुत स्वर सुमनांजली चा कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर शिवगीत गाऊन उपस्थित नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला तसेच
बजरंग दल शाखा भिसी यांचे वतीने शहरातील मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले
टायगर ग्रुप शाखा भिसी यांचे तर्फे शिव जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून भिसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र चांदे ,
डॉ. चंदन बावनकुळे( प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी), ममता डुकरे (मा. जि.प.सदस्या तथा भाजपा महिला आघाडी प्रमुख), तसेच सचिन गाडीवार , घनश्याम डुकरे (माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संघ पुणे) हे प्रामुख्याने उपस्थीत होते. टायगर ग्रुप भिसी तर्फे आयोजित विविध स्पर्धा मध्ये ऑनलाइन शिवकालीन वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रथम क्रमांकाचां मानकरी गौरव सुरेन्द्र मेश्राम, द्वितीय क्रमांकाचे मानकरी कुं. वैभवी नंदू सतीबावणे तर तृतीय क्रमांकाची मानकरी कु. स्वरा श्याम येरूनकर ही ठरली. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १००१ रू. रोख व पुष्गुच्छ ७७७ रूपये रोख व पुष्गुच्छ तसेच ५५५ रू. रोख व पुष्गुच्छ देऊन मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले. मागील पाच वर्षांपासून शिवजयंती उत्सव निमित्त टायगर ग्रुप तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.हि परंपरा कायम ठेवून यावर्षी सुध्दा भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी या रक्तदान शिबिरात डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी ५१ रक्तदात्यांचे रक्त संकलन केले आणि रक्तदात्याना कॉलेज बॅग व पाणी बाॅटल भेट देत रक्तदात्याचे अभिनंदन केले
तसेच या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर व टायगर ग्रुप शाखा भिसीचे सर्व सदस्य भिसीच्या पदाधिकारी, सदस्य, सहकारी सदस्य तसेच हितचिंतक यांनी अथक परिश्रम घेतले.