ताज्या घडामोडी

झिन्नर ता.वाशी बौध्द महिला सरपंच मारहाण सर्व आरोपींना तात्काळअटक करण्यात यावी वंचित बहुजन आघाडी ची मागणी

जिल्हा प्रतिनीधी :अहमद अन्सारी परभणी

वाशी तालुक्यातील झिन्नर येथे कृषी विभागाअंतर्गत सोयाबीन बियाण्याच्या वाटपावरून गावातील जातीयवादी लोकां कडून महिला सरपंचास व कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची घटना सोमवार दिनांक 14 रात्री झिन्नर या ठिकाणी घडली या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे
झिन्नर येथे कृषी विभागाच्या वतीने पेरणी साठी प्रकल्पा अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून लाभार्थी ठरलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी सकाळी ग्रामपंचायत मधून कृषी सहाय्यक बाळासाहेब डोईफोडे यांच्या उपस्थितीत बियाणे वाटप करण्यात आले यावेळी ऑनलाईन लाभार्थ्यांच्या यादीत नाव नसताना गावातील जातीयवादी लोकांकडून जातीयवादी मानसिकते मधून राजकारण आमच्या कडून शिका मागील वर्षी आम्ही तीन बॅगा घेतल्या होत्या आता ही घेऊन जाणार म्हणून 30 किलोच्या दोन बियाण्या च्या बॅग घेऊन गेले या विरोधात महिला सरपंच शिल्पा राजेंद्र गरड या तक्रार देण्यासाठी निघाल्या असता गावातील काही नागरिकांनी दोन्ही बाजूंची समजूत काढून प्रकरण मिटवले होते परंतु सायंकाळी सातच्या सुमारास महिला सरपंच शिल्पा राजेंद्र गरड त्यांचे पती राजेंद्र गरड दिलीप गरड चुलत सासरे अरुण गरड हे घरामध्ये बसलेले असताना आरोपी दिलीप सर्जेराव काळे नितीन राम हरी काळे शेषेराव बाबासाहेब काळे सचिन विनायक काळे खंडेराव गोरोबा तावरे बालाजी महारुद्र वाघमारे हरिदास वाघमारे गणेश अशोक पारडे विषाल श्रीमंत गपाट यांनी लाथा बुक्या दगड फावडे काठी व कुऱ्हाडी तुंब्यांने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली यामध्ये सरपंचा चे दीर सासरे पती यांना मार लागल्याने पुढील उपचारा साठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे या प्रकरणी सरपंच शिल्पा गरड यांच्या तक्रारीवरून नऊ जणां विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे पाच आरोपी फरार असून भुम चे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे हे तपास करत आहेत या प्रसंगी सदर घटनेच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने पीडित महिला सरपंच शिल्पा राजेंद्र गरड यांची झिन्नर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन पीडित कुटुंबीयांस धिर देण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल फुले-आंबेडकर विद्वत सभा राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे महिला आघाडी प्रमुख अँड.जीनत प्रधान अखिल भारतीय मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष मनीषा चौधरी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के सम्यक विद्यार्थी आंदोलन जयपाल सुकाळे जिल्हा प्रवक्ते प्रा.अरविंद खांडके,के टी गायकवाड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंद लगाडे जिल्हा कार्यकारणी सदस्य तानाजी बनसोडे कळंबं तालुका महासचिव अरुण गरड वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संतोष सरवदे इंद्रजीत गायकवाड प्रशांत गायकवाड दिलीप गरड विद्यानंद वाघमारे वैभव गायकवाड असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्या नंतर मंगळवारी घटनेची माहिती मिळाली बुधवारी सकाळी नऊ वाजता वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण टीम वाशी पोलीस ठाणे येथे दाखल झाली यावेळी पीडित बौद्ध महिला सरपंच शिल्पा राजेंद्र गरड यांना सोबत घेऊन वाशी पोलीस ठाणे येथे भूम चे उप विभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे साहेब यांच्या सोबत झालेल्या घटने संदर्भात चर्चा करून पीडित महिला सरपंच यांना संरक्षण देण्या संदर्भात चर्चा करण्यात आली चार आरोपी हे पकडण्यात आले असून उर्वरित पाच आरोपींना लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्यात यावी तसेच महिला सरपंच यांना संरक्षण देण्यात यावे उपचार घेत असलेले पीडीत यांची लवकरात लवकर जबाब घेण्यात यावा अशी उप विभागीय अधिकारी विषाल खांबे यांच्या समोर वंचित बहुजन आघाडी ने मागणी केली यानंतर झिन्नर या ठिकाणी जाऊन महिला सरपंच शिल्पा राजेंद्र गरड यांच्या निवास्थानी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी आपल्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभी आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यानंतर उस्मानाबाद येथे जाऊन शासकीय जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असलेले जखमी विचारपूस केली तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सोबत चर्चा करून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली पिडीत कुटुंबाला लवकरात-लवकर संरक्षण देऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली बौद्ध महिला सरपंच शिल्पा राजेंद्र गरड यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व कायदेशीर कार्यवाही लढाई लढण्यासाठी सोबत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close