मानवत शहरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवा पो. नि. सुभाष राठोड यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरात गुन्हेगारी वाढली असता अनेक वेळा शांतता भंग झाली आहे मानवत शहरात यापूर्वी जातीय दंगली मारामारी जबरी चोरी घरफोडी रोडा महिलांना छेडछाड मोबाईल चोरी मोटरसायकल चोरी यासारखे गुन्हे घडून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आगामी काळामध्ये मुस्लिम धर्मांचा मोहरम हिंदू धर्माचा पोळा गणेश उत्सव दुर्गा उत्सव यासारखे सण मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत सर्व धर्मांचे सण-उत्सव महापुरुषांचे पुतळे धार्मिक स्थळ सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अत्यंत गरज आहे सध्या काही दिवसापासून माणूस शहरांमध्ये चोरट्याने धुमाकूळ बचावला असून सर्वसामान्य जनता भयभीत होऊन रात्रीला जागरण करून स्वतःची गल्लीत गस्त घालीत आहे मानवत शहरातील सर्वसामान्य जनता सुरक्षित राहावी तसेच शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून महाराणा प्रताप चौक बस स्थानक एसबीआय बँक स्वामी विवेकानंद चौक शिवाजी महाराजांचा पुतळा मंत्री कर्नल एसबीआय बँक मेन मार्केट सावता माळी चौक नगरपरिषद कार्यालय जगनाडे चौक गजानन मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज झरी चौक के के एम कॉलेज पाळदी रोड, छत्रपती शिवाजी नगर गरुड पुतळा चौक हजरत टिपू सुलतान चौक या ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अत्यंत आवश्यकता आहे अशी मागणी एका निवेदनाद्वारे मानवत पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी मुख्य अधिकारी नगरपरिषद मानवत यांच्याकडे केली आहे .