स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृति दिनानिमित्त रेणाखळी येथे आरोग्य तपासणी शिबीर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
तालुक्यातील रेनाखळी येथे आज स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश बप्पा ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले .आरोग्य शिबिरात गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला , शिबिरात डॉ.एम.बी.कुमावत यांनी नेत्र तपासणी केली . आरोग्य शिबीरात ३५० रूग्णांना तपासण्यात आले त्यात ५५ रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले असता त्यांना दि.२३ -११ २०२१ ला जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्यात येणार आहे. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते मुंजाभाऊ हारकळ , तुकाराम हारकळ , बाबासाहेब हारकळ ,गोविंद चिंचाणे , ज्ञानेश्वर देपाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले . आरोग्य शिबीर रूग्णांना तपासण्यासाठी परिचारिका चव्हाण सिस्टर MPW , आशा कार्यकर्ती इंगळे, गिरी यांनी सहकार्य केले तसेच गावातील ,शे.सलीमभाई ,रामकिशन गिरी , पिंटू हारकळ , रमेश इंगळे , बबनराव हारकळ , कुंडलीक हारकळ व गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते .